
(New Dillhi)नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आज आपले पतधोरण जाहीर केले असून आपल्या रेपो दरात यंदा कुठलेही बदल केलेले (No Change in Repo Rate) नाहीत. त्याचा परिणाम म्हणून कर्जावरील व्याजाचे दर जैसे थे राहणार आहेत. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यास गृहकर्जाचा व्याजदर वाढतो. बँकेतून कर्ज घेतलेल्या व्यक्तीला परतफेडीची अधिक मोठी रक्कम भरावी लागते. (RBI)रिझर्व्ह बँक ऑफ इंडियायाने रेपो दरात कोणताही बदल केलेला नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती (Reserve Bank Governor Shaktikanta Das)रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीकडून अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. समितीने रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने मागील वर्षी रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली होती. या वर्षात विकास दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.