राष्ट्रपतींच्या दौऱ्यात मुख्यमंत्री नाही !

0

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या तीन दिवसाच्या नागपूर,विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही एकत्रितपणे नागपुरात पोहोचले. मात्र राष्ट्रपतींचे विमानतळावर आणि यानंतर राजभवनमध्ये स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले ते आज राष्ट्पतींच्या गडचिरोली आणि नागपूर दौऱ्यातही न आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. रात्री शिवसेना नेते आमदारांची एक बैठक मुंबईत दीपक केसरकर यांच्या ‘रामटेक’ या निवासस्थानी होती. या बैठकीत तसेच मंत्रिमंडळ बैठकीतही अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरची अस्वस्थता पहायला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, ही बैठक आधीच ठरलेली असल्यामुळे ते मुंबईला परतल्याचे शिंदे समर्थक सांगत असले तरी राष्ट्रपतींच्या दौऱ्यात गडचिरोली व कोराडीला मुख्यमंत्री प्रोटोकॉलनुसार हजर राहणे आवश्यक असताना ते अचानक का परतले यावरून सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडी लक्षात घेता चर्चेला उधाण आले आहे.