संशोधनासाठी वयाचे बंधन नाही – डॉ. राजेश बिनिवाले

0
संशोधनासाठी वयाचे बंधन नाही – डॉ. राजेश बिनिवाले
There is no age limit for research – Dr. Rajesh Binivale

सी.पी. अँड बेरार कॉलेजच्‍या ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ कार्यशाळेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

नागपूर:-संशोधन करण्‍यासाठी वयाचे बंधन नसून तो आवडीचा भाग आहे. कोणत्याही वयात संशोधनाला सुरुवात करता येते. मनापासून एखाद्या विषयाची रुची निर्माण झाली असेल तर त्‍या विषयावर संशोधनाचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते, असे प्रतिपादन नीरीचे संचालक डॉ. राजेश बिनिवाले यांनी केले.

पीएचडी प्राप्त करू इच्छिणाऱ्या संशोधकांकरिता चार क्रेडिटच्‍या ‘रिसर्च मेथोडोलॉजी’ कार्यशाळेचे आयोजन सी.पी. अँड बेरार महाविद्यालयातील प्लेस फॉर हायर लर्निंग अँड रिसर्च या विभागाद्वारे करण्‍यात आले. देशभरातील 70 विद्यार्थ्‍यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेच्‍या समारोपीय कार्यक्रमाला डॉ. राजेश बिनिवाले प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थ‍ित होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी एमबीए विभागाचे समन्वयक शरद भावे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना संशोधन करत असताना शारीरिक क्षमता कशी टिकवून ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन डॉ. मेधा कानेटकर यांनी केले. नऊ दिवस चाललेल्‍या या कार्यशाळेमध्‍ये डॉ. सुमित अरोरा, डॉ. तुषार चौधरी, डॉ. रेखा शर्मा, डॉ. केशव वाळके, डॉ. चंदा सिन्हा बाबू, डॉ. मेधा कानेटकर या तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. त्‍यांनी संशोधनाचा विषय कसा निवडावा, उद्दिष्ट कशी निश्चित करावी, गृहितके कशी निश्चित करावी, त्यानुसार माहितीचे संकलन कसे करावे, नमुना निवड कशी करावी तसेच माहितीचे विश्लेषण कसे करावे यावर विस्तृत माहिती दिली.