भाजपातच गटबाजी जोरात -विजय वडेट्टीवार यांचा आरोप

0

 

नागपूर  (Nagpur)– पक्ष म्हटले की मतभेद गटबाजी आलेही काँग्रेस पक्षातही मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती काँग्रेस आता एकसंघ आहे, ही कीड भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतं घुशीला बोक्या व्हावा. बोक्याला वाटतं की मी त्यापेक्षा चपळ प्राणी होता येईलं का… राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. राजकारणात महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काढण्यासाठी दाबन वापरतात की सुई वापरतात हे येत्या काही दिवसात कळेल असे सूचक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणले जाईल असे सांगितले याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्यासाठी 70 हजार कोटी त्यांच्याकडे आहेत. राजकारणाला धंदा समजणाऱ्याची भाषा अशीच असणार.
हे राजकारण समाजसेवचे व्रत आहे. निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे. संघ भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या देशांमध्ये कुठली विचारधारा नाही म्हणून त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात असा आरोप केला.