अग्निशमन सेवांमध्ये प्रतिसादाची वेळ कमी करणे गरजेचे

0

जीवन-मृत्यूसंबंधित घटनांमध्‍ये अग्निशमन सेवांकडून मिळणा-या प्रतिसादाचा वेळ कमी करणे आवश्यक असल्‍याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी), राज नगर, नागपूर येथे “शहरीकरण, औद्योगिकीकरण, हवामान बदल,” या विषयावरील संवादात्मक सत्रादरम्यान ते अग्निशमन सेवांसमोरील आव्हाने या विषयावर बोलत होते. एनएफएससीचे संचालक नागेश शिंगणे यांची यावेळी उपस्‍थि‍ती होती.

चौधरी यांनी हवामान बदलामुळे तीव्र झालेल्या शहरी पुरासारख्या वारंवार आणि गंभीर नैसर्गिक आपत्तींमुळे अग्निशमन सेवेवरील वाढलेल्या ताणावर चर्चा केली. यामुळे नागपूर महानगरपालिकेने आपत्कालीन तयारीसाठी संसाधने वाढवली असल्‍याचे ते म्‍हणाले. “भविष्‍यातील आपत्‍तींचा सामना करण्‍यासाठी संरचित, सतत प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक असल्‍याचेही ते म्‍हणाले.

प्रतिसादाची वेळ अनुकूल करण्यासाठी मास्‍टर प्‍लॅन तयार करण्‍यात आला असून 22 अग्निशमन केंद्रे तयार करण्‍यात येत आहेत. त्‍यापैकी 11 सध्या कार्यरत आहेत आणि 2 चे बांधकाम सुरू आहेत. दुर्घटना स्‍थळी वाहन तातडीने वाहन पाठवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करून केंद्रीय कमांड आणि कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

नागेश शिंगणे यांनी नागेश शिंगणे यांनी एनएफएससीची दीर्घकालीन भूमिका, संपूर्ण भारतातील अग्निशमन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि अग्निशामक अभियांत्रिकीचे प्रगत अभ्यासक्रम सुरू करणे याविषयीची भूमिका मांडली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत एनएफएससीच्‍या सहकार्यावर त्‍यांनी भर दिला. नागपूर महानगरपालिकेसोबत राष्ट्रीय मानक स्थापित करू शकेल असे मॉडेल प्रायोगिक तत्त्वावर विकसीत करण्‍याचे ध्येय असल्‍याचे ते म्‍हणाले. त्‍यानंतर संवादात्मक सत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन अद्वित द्विवेदी आणि शिवांगी सोनवाल यांनी केले तर आभार गगन उपाध्याय यांनी मानले.