मग सर्वच जागी पाठींबा द्या

0

 

नागपूर (Nagpur)– समर्थन द्यायचेच आहे तर वंचितने सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही. साताऱ्याबाबत चर्चा नाही. कोणाचा कुणाशी संबंध आहे? ते योग्य वेळी सांगू अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.मविआच्या सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती.

काल बैठक झाली. दिल्लीतून काय चर्चा झाली, ते आदेश देणार, त्याचे पालन करू,प्रकाश आंबेडकर यांना आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. त्यांना द्यायचे असेल, तर ते देऊ शकतात. मी पण वंचित आहे.शेतकऱ्यांचा मुलगा आहे.मला व्यक्तिगत टॉर्चर केले जात आहे.हे काही बरोबर नाही, त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ असे स्पष्ट करतानाच रामटेकमध्ये आता रश्मी बर्वे विषय संपला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत ते नक्की निवडून येतील.