“तर राज्यात मराठेच शिल्लकच राहणार नाहीत”: भुजबळ

0

नागपूर- मराठा समाजातील सारेच कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत असल्याने महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही. सर्वच कुणबी होतील, त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे, असे मला वाटत नसल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मराठा आरक्षणावरुन त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. (Chhagan Bhujbal on Maratha Reservation Issue)
भुजबळ म्हणाले, हा ओबीसींचा आयोगही राहिलेला नाही तर तो मराठ्यांचा झाला आहे. सर्वच मराठा जर कुणबी होणार असतील तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा वगैरे..पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत, याकडे त्यानी लक्ष वेधले. सध्याच्या घडीला दादागिरीने कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. यापुढेही जातपडताळणीच्या वेळी हेच होणार आहे. दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्रे घेतली जाणार आहेत. न्यायमूर्ती शिंदे हे गावांमध्ये फिरून हे करा ते करा सांगत आहेत, असेही ते म्हणाले.