
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रहार केला आहे. दादागिरीला दादागिरीनंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा भुजबळांनी जरांगेंना दिलाय. तसंच राज्यात सगळे कुणबी होतील, एकही मराठा शिल्लक राहणार नाही, याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला.
इंदापुरात भुजबळांनी ओबीसी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी हर्षवर्धन पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकिट घेणार का? मोहिते पाटील तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार का? असा सवालही भुजबळांनी केला(Maharashtra Politics).
अति मागास करून त्यांना सेफ ठवले आहे. सध्या 27 टक्के आरक्षण आहे. पण नोकऱ्या 9.5 टक्के इतक्या आहेत. आधी आमचे 27 टक्के आरक्षण पूर्ण भरा, अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली. OBC आरक्षणात त्यांना आरक्षण दिले. त्यांना का दिले असे आम्ही म्हणत नाही. काही जास्त मागत नाही. पण, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका अशी आमची भूमिका असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.