रात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप तर पहाटे पाच पर्यंत बियर बार सुरू

0

 

नागपूर – आज 31डिसेंबर 2023 अर्थात मावळत्या वर्षाला निरोप आपण देणार आहोत. थर्टी फस्ट व नववर्षाचे स्वागत सर्वत्र
नागरिक मोठ्या उत्साहाने करत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने रविवारी 31 डिसेंबर रोजी रात्री एक वाजेपर्यंत वाईन शॉप तर पहाटे पाच पर्यंत बियर बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.नागरिकांनी परवाना असणाऱ्या शॉपमधूनच मद्य खरेदी करावे. खाजगी पार्टी करणाऱ्यांनाही परवानगी बंधनकारक असेल, उघड्यावर कुठेही दारू पिऊन नये व दारू पिऊन ड्राईव्ह करू नये अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संतोष झगडे यांनी दिल्या आहेत.