

-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात १२ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजन
(NAGPUR)नागपूर : (२८-१२-२०२३)
(Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव १२ ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान होणार आहे. विद्यापीठ क्रीडा संकुल परिसरात आयोजित क्रीडा महोत्सव तयारीचा माननीय (Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आढावा घेतला. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली होणार आहे. क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांचे सुमारे २४०० विद्यार्थी सहभागी होणार आहे. या क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्स, बॅटमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळांचे मुले व मुलींच्या संघांचे सामने होणार आहे. राज्य क्रीडा महोत्सव जवळ येत असल्याने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धा नियोजित असलेल्या परिसरातील विविध कामांची पाहणी कुलगुरू डॉ. चौधरी यांनी केली. स्पर्धा परिसरात नव्याने पार्किंग व्यवस्था तयार करणे. नवीन कॅफेट एरिया उभारणे. परिसराची रंगरंगोटी करणे.
कायमस्वरूपी नवीन ३ प्रवेशद्वाराची निर्मिती करणे. परिसर सौंदर्यकरण त्याचप्रमाणे बास्केटबॉल कोर्टची रंगरंगोटी करणे आदी महत्त्वपूर्ण सूचना कुलगुरूंनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या. मैदानी खेळ परिसरात विविध सुविधा निर्माण करीत या भागात विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, विद्यापीठ अभियंता श्री नितीन विश्वकार, उद्यान अधीक्षक श्री प्रवीण गोतमारे, उपअभियंता श्री महेंद्र पाटील, डॉ. आदित्य सोनी, डॉ. नितीन जांगीटवार, डॉ. मनोज आंबटकर, राजेंद्र बालपांडे यांच्यासह अन्य उपस्थित होते. स्पर्धा परिसरात सुसज्ज असा वैद्यकीय कक्ष उभारण्याबाबत कुलगुरूंनी यावेळी सूचना दिल्या.