महाराष्ट्रातील दिग्गज नेता जाणार शहांच्या भेटीला

0

राजीनाम्याच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारणात खळबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी महायुतीला पाहिजे तसे यश न मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत राजीनामा देऊ नये असा सल्ला केंद्राच्या वरिष्ठांनी दिला आहे. दुसरीकडे नागपूर विमानतळावर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर समर्थनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली. फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय व्हावे अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केल्या. दरम्यान आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस नागपूर आले होते. त्यानंतर ते सायंकाळी दिल्लीला रवाना होणार असून, भाजपचे नेते अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजीनामेच्या घोषणेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राज्याचे नेते असल्याचे सांगत त्यांच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात विकासाच्या योजना आल्याचे सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामध्ये पुढील पाच वर्ष केंद्रामध्ये सत्ता स्थापन होत असून, राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील निवडणुका होतील असे स्पष्ट सांगत बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देऊनही असा सल्ला दिला आहे.

दरम्यान आज निवडणूक आयोग राष्ट्रपती यांना नवनिर्वाचित खासदारांची यादी सोपविणार आहे. त्यानंतर अधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल. इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून, पंतप्रधान म्हणून ते येत्या आठ जून रोजी ऐवजी 9 जून रोजी शपथ घेतील, अशी शक्यता आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होईल, याची यादी तयार करण्याची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये तयार होणार आहे.