

माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची सभागृहात मागणी
जनभावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी विकासकामावर दिली स्थगिती
नागपूर(Nagpur) २ जुलै :- नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला . येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी सोमवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत(Dr. Nitin Raut) यांनी सभागृहात केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, महापरिनिर्वाण दिनी आणि बुद्ध पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात. या परिसरात 10 लाखांच्यावर लोक येत असतात. याठिकाणी कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना स्मारक समितीने येथे अंडरग्राऊंड पार्किंगचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. राज्य सरकार आणि समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये. अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी लोक भावनेचा आदर करुन येथील अंडरग्राउंड पार्किंगचे काम तात्काळ थांबविण्याकरिता विधानसभेत हा मुद्दा लावून धरला.
दिक्षाभूमी येथील बांधकामाचे आणि घडलेल्या घटनेकडे सरकारचं लक्ष वेधत डॉ. राऊत पुढे म्हणालेत, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. त्यांच्याकडून सूचना घ्यायला हव्या होत्या. त्यानंतर बांधकाम सुरु करायला पाहिजे अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी स्मारक समिती आणि सरकारचे कान टोचले राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत दीक्षाभूमी येथील अंडरग्राउंड पार्किंगच्या मुद्दा लावून धरला होता. दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते.
मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल: अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची विधानसभेत घोषणा केली दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंग झाल्यास दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी पार्किंग करू नका. पार्किंगच हवी असले तर या परिसरात पुढे पावणेचार एकरची जागा आहे. ती जागा दीक्षाभूमीला देण्याची मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे. या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जावू शकते.