महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात गुंजणार स्वरांजलीचा सूर!

0

सांस्कृतिक मेजवानीसाठी चांदा क्लब ग्राउंड सज्ज

चंद्रपूर: महाराष्ट्र दिनाच्या पावन पर्वनिमित्त चंद्रपूरकरांना एका अविस्मरणीय सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. “स्वरांजली” नावाचा हा भव्य संगीत महोत्सव चांदा क्लब ग्राउंड मध्ये १ मे रोजी, महाराष्ट्र दिना निमित्त सायंकाळी ६ वाजता पासून रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. (The tune of Swaranjali will resonate in Chandrapur on Maharashtra Day!)

अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित या महोत्सवात प्रसिद्ध गायक आणि गायिकांचा सहभाग असणार आहे. सुर नवा ध्यास नवा, सा रे ग म प झी मराठी फेम, ५७ व्या महाराष्ट्र राज्यात चित्रपट पुरस्कार विजेती, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा कुंभार (madhura kumbhar singer), सारेगमप, इंडियन आयडल, सुर नवा ध्यास नवा फेम प्लेबॅक सिंगर प्रसेनजीत कोसंबी, द केरला स्टोरी प्लेबॅक सिंगर, सुर नवा ध्यास नवा उपविजेती सारेगमप फेम अंशिका चोणकर यांच्या मधुर आवाजात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गाणी ऐकायला मिळणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आणि महाराष्ट्र दिनाचे उत्सव साजरे करण्यासाठी चंद्रपूरकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.