राजकीय डावपेचाच्‍या एकांकिकांनी गाजला तिसरा दिवस

0
कला सागरच्‍या एकांकिका बहुभाषी नाट्य महोत्सव
नागपूर,(Nagpur) : मणिपुरची राजकुमारी चित्रांगदा हिच्या शौयाची गाथा असलेली लेखक-दिग्‍दर्शक विशाल तराळ यांची एकांकिका ‘चित्रांगदा, मानव कौल लिखित व कुणाल टोंगे दिग्‍दर्शित बगिच्‍यात भेटणा-या व्‍यक्‍तींच्‍या भावभावनांचे प्रकटीकरण असलेली ‘पार्क’ आणि बद्रू दूजा इरशाद यांचे लेखन व दिग्‍दर्शन असेलली राजकीय घटनांवर आधारित ‘आज की राजनिती’ आणि अशा तीन एकांकिका बहुभाषी नाट्य महोत्सवाच्‍या तिस-या दिवशी सादर करण्‍यात आल्‍या.
कला सागर या सांस्‍कृ‍तिक, साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक संस्‍थेच्‍यावतीने व विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या सहकार्याने 19 वा एकांकिका बहुभाषी नाट्य महोत्सव स्व. रामगोपाल माहेश्वरी सभागृह, मोर हिंदी भवन येथे सुरू आहे. महोत्‍सवाच्‍या तिस-या दिवशी स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेवलपर्सचे रमेश पिसे, इंद्रायनी टी.व्ही.एस.चे विलास हरडे, शिवल असोसिएटचे नरेंद्र डाखले, मनपाचे निवृत्‍त कार्यकारी अभियंता, मनोज गणवीर, शैलेश सिंह ठाकुर यांच्‍यासह कला सागरचे पदाधिकारी पदम् नायर, रविशेखर गिल्लूरकर, सुशील तिवारी, डॉ. रमेश बारस्कर, सुरेश सांगोलकर, डॉ झेलम कटोच, अरविंद लोंढे, अनुभव डोंगरे, नीलिमा मोटघरे यांची उपस्‍थ‍िती होती. परीक्षक म्‍हणून हेमलता मिश्र ‘मानवी’, डॉ. रविंद्र हरिदास व विनोद गार्जलवार जबाबदारी सांभाळत आहेत.