वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

0
महाराष्ट्रातील नवीन सरकारचा, नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी राजभवनावर होणार नसून, तो मुंबईच्या वानखेडेवर स्टेडियमवर पार पडेल असे वृत्त आहे.
या आयोजनासाठी तयारी करण्याच्या हालचाली वानखेडे स्टेडियमवर सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते. आता याबाबतची माहिती समोर येत आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा मुंबई वानखेडेवर आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर झाले नसले तरी, वानखेडेवर शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे.

2014 मध्ये आघाडीकडून सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला होता. त्यावेळी भाजपाचे सुमारे ३५००० कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. तसाच भव्यदिव्य सोहळा पुन्हा आयोजित करण्याच्या तयारीला भाजपा लागली आहे.

यंदा महायुतीला २३६ जागा मिळाल्या आहेत. तर मविआला ४९ व अपक्ष व इतरांना ४ जागा मिळल्या आहेत.03:57 PM