यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण होणार -दिलीप पनकुले यांना आयुक्तांची ग्वाही

0

नागपूर :-सातत्याने पंधरा वर्षांपासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याकडे नागपूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष असून हा पुतळा अंधारात आहे. त्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन यांचे लक्ष वेधले असता राजीव गांधी चौक (अजनी चौक) येथे स्थापित महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सौंदर्यीकरण व विद्युत रोषणाई लवकरच होणार असल्याचे आश्वासन राधाकृष्णन यांनी दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी लेखी स्वरूपात मनपा आयुक्त राधाकृष्णन यांना निवेदन दिले. एकंदर परिस्थितीच्या आढाव्याबाबत चर्चा केली. विशेषत: हा राजमार्ग असून देशातील प्रतिष्ठित नेते, मंत्री व अधिकारी ह्या मार्गाने जात असतात, याकडे दिलीप पनकुले यांनी लक्ष वेधले. अखेरीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष देऊन सर्व समस्या त्वरित सोडविण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 

यावेळी माजी आमदार दीनानाथ पडोळे, महिला आयोग सदस्य आभा पांडे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंग परिहार, अनिल अहिरकर, प्रवीण कुंटे, मच्छिंद्र आवळे, विजय मसराम, श्रीकांत शिवणकर, वेदप्रकाश आर्य, वर्षाताई शामकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.