मुंबई : राष्ट्रवादीतील नेते सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार याच महिन्यात होण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांकडून व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी दिली जाणार असून शिंदे गटातील नाराजी संपविण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती आहे. यंदा होणाऱ्याा मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार असून शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांना विस्तारात संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीतील एक गट सरकारमध्ये सामील झाल्यावर शिंदे गटात नाराजीचे वातावरण होते. या गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून आहेत. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपद मिळाल्याने शिंदे गटाच्या अनेत आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. तशा प्रतिक्रिया देखील या आमदारांकडून आल्या आहेत
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
MAHARASHTRA
MAHARASHTRA
Breaking news












