

यवतमाळ(Yavatmal): मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते सराटी मार्गावर अल्टो कारने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली. खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे वय 34 वर्ष रा. खंडणी ता मारेगाव हे कारने आज सहकुटुंब बोटोनी येथे मुलाला घेऊन दवाखान्यात उपचारासाठी आले होते. तेथील दवाखान्याचे काम आटोपुन बोटोनी ते सराटी मार्गाने परत खंडणी येथे जात असताना बोटोनी जवळ अचानक चालत्या कारमध्ये शॉर्टसर्किट झाले व कारला भीषण आग लागली कार चालकाने सावधगिरी बाळगत गाडी बंद करून कारच्याखाली उतरून कारमधील सर्वांना सुखरूप जागी नेले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असून या घटनेत मात्र कार जळून खाक झाली.