
-संजय राऊत
(Mumbai)मुंबई :शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जोपर्यंत तुमच्या सारखी माणसे सरकारच्या ताटाखालची मांजर बनून बसलेली आहेत, तोपर्यंत सरकार कसे पडणार? अशी टीका त्यांनी नार्वेकरांवर केली. (Shiv Sena MP Sanjay Raut on Rahul Narvekar)
सरकार कोणाच्या म्हणण्याने पडत नसते, असे नार्वेकर काल म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी नार्वेकरांवर ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप केला. राऊत म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर त्याच विचाराची व्यक्ती बसलेली आहे व बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे. अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून सरकारची वकिली करु शकत नाही.