

ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर(Nagpur) 14 जुलै :-ज्येष्ठ नागरिकांसाठी बंद झालेल्या रेल्वेच्या सोईसुविधा परत सुरू करा, लाडकी बहीण योजनेत 65 वर्षांवरील स्त्रियांसाठी लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा मोफत द्या, अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ, विदर्भतर्फे रविवारी गांधी पुतळा, व्हेरायटी चौकात निदर्शने करण्यात आली. ‘हमारी मांगे पुरी करो’, ‘जेष्ठांना न्याय मिळायलाच पाहिजे’, ‘जागे व्हा जेष्ठांसाठी सरकार जागे व्हा’ यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
जेष्ठ नागरिक महामंडळाचे, विदर्भ नागपूर अध्यक्ष प्रभूजी देशपांडे, सचिव ॲड. अविनाश तेलंग व कमलाकर नगरकर, ॲड. स्मिता देशपांडे, विनोद व्यवहारे, अनिल पत्रीकर, प्रकाश मिरकुटे, श्यामजी पातुरकर, दीपक शेंडेकर, ॲड. अविनाश जोशी, उल्लास शिंदे, ईश्वर वनकर, लीलाधर रेवतकर, कॅप्टन प्रभाकर विंचूरकर, दत्त फडणवीस, मनोहर वानखेडे, कृष्णराव खंडाळे, रामदास ठावकर, राजेश बोरकर, निरंजन कुकडे, अशोक बंडाने, रामदास जोगदंड, अशोक बेलसरे, बबनराव फाळके, गणेश देवल, कमलाकर नगरकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
वाहनांचे नामांकन (नॉमिनेशन), रेल्वे प्रवासी सवलत पूर्वीप्रमाणे लागू करावी, इपीएस 95 लाभार्थींना कोश्यारी कमिटी शिफारशी लागू करावी आणि 1.9.2014 पूर्वीच्या निवृत्तांना वाढीव पेंशन लागू करावी, कम्युटेशन वसुली कालावधी 10 वर्षाचा कोरोना काळातील रोखलेले 18 महिन्याचा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा, विजा करता नागपुरात कार्यालय हवे, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भशी संलग्नित विविध मंडळाचे सभासद, जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान, फेस्कॉम, नागपूर जिल्हा सिनियर सिटीझन काऊसिलचे अनेक जेष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.