

तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये संस्काराचे बीज रुजण्याचा एक प्रयत्न म्हणजे आमचा हा संस्कार वर्ग स्वामीजींच्या मार्गदर्शनामुळे हा संस्कार वर्गाचा पाया रचला गेला. श्री.शिवशंकर स्वामीजी आणि श्री.सिद्धार्थ स्वामीजी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे आयोजक सौ.कल्पना नितीन अडिकने आणि श्री.नितीन मनोहर अडिकणे यांनी केले संस्कार वर्गात रित्या शिक्षिका कुमारी अमृनी हिवरखेडे यांनी मुलांना श्रीकृष्णाच्या विविध गाण्यांवर नृत्य शिकवले तर कुमार वीरांची गजरे या संगीतातून भजन शिकवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रक्षा सौरभ अडीकने यांनी केले संस्कार वर्ग पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित केला गेला.
यामध्ये विविध कलाकृती मुलांना शिकवण्यात आला मुलांना स्त्रोत भजना बरोबरच माती पासून विविध वस्तू तयार करणे चित्रकला,हस्तकला विविध प्रकारचे फळांची सजावट या वर्गात शिकवण्यात आली गो पूजेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही मुलांना आईच्या शाळेत सुद्धा नेले आई-वडील आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहेत त्याची पूजा हीच ईश्वर पूजा आहे हे पाठवून देण्यासाठी मातृ-पितृ पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता संस्कृती कार्यक्रमाने पार पडली. मुलांच्या सप्त गुणाचे प्रदर्शन ह्या दिवशी करण्यात आले मुलांना प्रशस्तीपत्र देण्यात आली स्वामीजींचे आशीर्वादाने संस्कार वर्ग यशस्वी इतर पार पडले कार्यक्रमासाठी युवा टीमने आम्हाला सहकार्य केले सिद्धारूढ स्वामी मंदिरातील श्री चंद्रशेखर नगरा यांनी सौ कल्पना नितीन अडकणे व श्री नितीन मनोहर अडकणे यांचे रुपये 2100 व शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.