

मोठ्या वाहनाच्या धडकेने वाकले सुरक्षा कठडे
जागरूक नागरिकांच्या मदतीने काढण्यात आले सुरक्षा कठडे
नागपूर(Nagpur) :- अजनी रेल्वे पुलावर कुठल्यातरी मोठ्या वाहनाच्या धडकेने पुलाच्या काठावर लागलेले वजनी सुरक्षा कठडे संपूर्णत: वाकले,मात्र आश्चर्य म्हणजे त्या क्षतिग्रस्त झालेल्या पुलाखालून वाहतूक नियमित सुरूच होती .ते कधीही खाली पडले असते,त्यात मोठी जीवितहानी झाली असती.त्यामुळे शहरातील एका जागरूक नागरिकाने त्या कठड्याजवळ प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर ही बाब अतिशय धोकादायक वाटली.त्यामुळे त्याने एका कारमध्ये जाणाऱ्या काही तरुण मुलांना मदती करिता बोलविले.सर्वांच्या साहाय्याने सर्वप्रथम तो रस्ता बॅरिगेट लावून बंद केला.नंतर रेल्वे प्रशासनाला सूचना देऊन हे वाकलेले वजनी कठडे क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आले. प्रदिप सोनुले नावाच्या या जागरूक व्यक्ती प्रमाणेच शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराप्रती आपली जवाबदारी पार पाडल्यास शहरात कुठलीही अपरिहार्य घटना घडणार नाही.
आज दि.२५ जून २०२४ ला दु.३.३० वा.अजनी रेल्वे पुलावर कुठल्यातरी मोठ्या वाहनाच्या धडकेने लावलेले वजनी सुरक्षा कठडे संपूर्णत: वाकलेले दिसले.आश्चर्य म्हणजे त्या खालून वाहतूक नियमित सुरूच होती.ते कधीही खाली पडले असते,त्यात मोठी जीवितहानी झाली असती.प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहिल्यावर ही बाब अतिशय धोकादायक वाटली.मी तेथून एका कारमध्ये जाणाऱ्या काही तरुण मुलांना मदती करिता बोलविले. सर्वांच्या साहाय्याने सर्वप्रथम तो रस्ता बॅरिगेट लावून बंद केला. नंतर रेल्वे प्रशासनाला सूचना देऊन हे वाकलेले वजनी कठडे क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आले. एक मोठी दुर्घटना घडण्यापुर्वी सर्व काही सुरळीत व्हावे, आधी मागणी मंत्री – भाजपा नागपूर महानगर प्रदीप सोनुले(Pradeep Sonule) यांनी केली आहे.