

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सीए इंटरमिजिएट तसेच फाउंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल बुधवारी जाहीर केला आहे.
यानुसार, इंटरमिजिएटमध्ये शहरातून प्रत्युष गांधी याने प्रथम क्रमांक पटकाविला.सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित झाला.
यंदा, देशभरातील एकूण ७०,४३७ विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षा दिली. यातील केवळ १३,८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात नागपूरातील २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये प्रत्युष गांधी याने शहरातून पहिला क्रमांक पटकाविला.त्यापाठोपाठ अमेय लेले, भानू पालिवाल, अंजू जैन, साक्षी गोपचंदानी, विशुद्ध चिंचखेडे यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळविला.
याशिवाय फाउंडेशन परीक्षा ७५२ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२६ जण उत्तीर्ण झालेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार आयसीएआयच्या icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहू शकतात. त्याशिवाय, icai.nic.in foundation result: आणि https://icai.nic.in/caresult/ या लिंकद्वारे सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएटचे निकाल तपासता येणार आहेत.