

नागपूर(Nagpur), 12 जुलै :- नवोदित गायिका व संगीतकार रिद्धी विकमशी(Riddhi Vikamshi) यांच्या ‘कांहे’ या गीताचा विमोचन सोहळा रविवार,14 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता चिटणवीस सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकचे विद्यार्थी असलेल्या रिद्धी विकमशी यांनी सुमेर नाईक व अँटोनी मॅथ्यू यांच्या सहकार्याने तयार केलेल्या या गाण्यात सुमेर नाईक यांनी गीटार, अँटोनी मॅथ्यू यांनी पियानो, आदित्य पाहुजा, ऋतूपर्ण बर्गट याने व्हायोलिन, जोक्वीन ओरिबेलोने बास तर जोशुआ टून याने ड्रम्स वाजवले आहे. रिद्धी विकमशीने त्याला स्वरसाज चढवला आहे.
या गाण्यात बॉसा नोवा, जाझ आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा सुरेख मेळ साधण्यात आला आहे. या गीताचे मिक्सींग दीप्था गणेश यांनी केले असून संदीप यांनी मास्टर्ड केले आहे. रविवारी होणारी या विमोचन सोहळ्यात रिद्धी विकमशी या गाण्यासह त्यांची विविध नवी ओरिजनल गाणी प्रस्तुत करतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अलग अँगल-कम्युनिटी आर्टच्या संचालक मिली विकमसी यांनी केले आहे.