पोलिसांनी कारवाईत जप्त केलेला गांजा केला नष्ट

0

 

(Buldhana)बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी कारवाईत पकडलेला तब्बल ४५९ गांजा नष्ट करण्यात आला आहे. खामगाव शहरातील एमआयडीसी भागातील वाईज इन्फोकेअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आज ४ जानेवारी रोजी दिवसभरात हा गांजा नष्ट करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता.

न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबतचा आदेश मिळविला. त्यानुसार हा गांजा खामगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वाईज इन्फो केअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सदर गांजा हा नष्ट केला आहे. ही प्रक्रिया सुरू असताना प्रदुषण होणार नाही व आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डीवायएसपी जयंत सातव, आर्थिक गुन्हे शाखा पथक ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.