खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

0

 

(Nagpur)नागपूर – मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटविण्याकरीता गेलेल्या तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने जखमी केल्याची घटना बुधवारी पाचपावली पोलीस स्टेशन परीसरात घडली होती. या घटनेतील जखमी अभिषेकवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी रोहित नाहरकर यांच्या मेहुणीचे आशीष बडल यांच्याशी अनेक दिवसापासून प्रेमसंबंध होते. मात्र, आशिष बडल हा सदर मुलीसोबत लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता. अभिषेकला या प्रकरणाची माहिती होती, म्हणून दोघांमधील असलेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने रात्री ठरविलेल्या घटनास्थळी तो भेटायला गेला.

मात्र, आरोपी रोहित नाहरकर, शाम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचा वादविवाद झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करुन गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुंन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण सोमवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाचपावली यांनी दिली.