

बेळगांव(Belgaon):- (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
बेळगावमध्ये कोर्ट परिसरात गुंड जयेश पुजारीला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड जयेश पुजारी अटकेत आहे. याप्रकरणी आज त्याला बेळगाव कोर्टात हजर करण्यात आलं.
कोर्टात सुनावणीदरम्यान त्याने अनेकदा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही असं सांगत जयेश पुजारी याने भर कोर्टात या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला कोर्टा बाहेर आणताच परिसरात मारहाण केली.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दत्त आणि दहशतवाद्यामध्ये चकमक, एका दहशतवाद्याला घातलं कंठस्रान
जयेश पुजारीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान त्याने एका आयपीएस अधिकाऱ्यालाही धमकावलं होतं. जयेश पुजारी सध्या अटकेत असून हिंडलगा जेलमध्ये बंद आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
लोकसभा सभापती पदासाठी आंध्र प्रदेशातून हे नावं समोर, चंद्रबाबूंना रोखण्यासाठी मोठी खेळी
एक कोटीची सुपारी, ड्राइवरच्या हाताने सुनेन केला सासऱ्याचा गेम…..
जयेश पुजारीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने नागरिक संतापले होते. पोलीस त्याला घेऊन कोर्टाच्या बाहेर येताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही नागरिक मात्र मागे हटण्यास तयार नव्हते. यादरम्यान तो माझे काही कागदपत्रं खाली पडती आहेत असं सागंण्याचा प्रयत्न करत होता. नागरिक संतप्त झाल्याने कोर्ट परिसरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होत.