
प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकार देतंय 1 लाख रुपये,अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस मदत करण्यासाठी आणि त्यांचे कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते.शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते, ज्यामुळे जलसंधारणास मदत होते आणि सिंचनाच्या सोयीसाठी अधिक सुविधा मिळतात.
या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे: अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील शेतकरी असावा. त्याच्याकडे वैध जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. नवीन विहीर खोदण्याच्या सुविधेसाठी किमान 0.40 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. सामूहिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकत्रित कुटुंबाची किमान 0.40 हेक्टर जमीन असावी. इतर कृषी विकास योजनांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त 6 हेक्टर शेतजमीनच्या मर्यादेपर्यंतच अर्जदार पात्र ठरू शकतो. अर्जदाराकडे सातबारा उतारा आणि 8-अ उतारा असावा. तसेच आधार कार्ड अनिवार्य असून बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. ग्रामसभेची शिफारस अनिवार्य आहे.शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
Farm pond diagram
Types of farm ponds
Farm pond PDF
Farm pond information
Farm pond ppt
Farm pond construction
Farm pond design
Farm pond MGNREGA
Types of farm ponds
Farm pond PDF
Farm pond information
Farm pond ppt
Farm pond construction
Farm pond design
Farm pond MGNREGA
















