ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

0

मराठी चित्रपट सृष्टीवर आघात करणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं.