राष्ट्रीय पक्षाने गल्लीत लक्ष घालायचं नसतं- खासदार संजय राऊत

0

 

सांगली (sangli) – काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक -एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(ShiV Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.
इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत तर काँग्रेस (Congress)चाच पंतप्रधान बनणार आहे. मग अशा परिस्थितीत रुसवे- फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगलीबाबत नाराजी असण्याचं काही नाही, असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, सांगली असो व भिवंडी याबाबत आता निर्णय झालेला आहे. सांगली शिवसेना लढवणार तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.