

देवराव कुबडे सेवा प्रतिष्ठान, नागपूर निर्मित क्रांतिनायक नाटकाच्या यशस्वी कलाकृतीनंतर एकनाथ षष्ठी निमित्त संत एकनाथ महाराज यांच्या जीवनावर आधारित अनाथांचा नाथ या नाटकाचा मुहूर्त कामगार कल्याण केंद्र रघुजीनगर येथील सभागृहात संपन्न झाला.
या नाटकाचा मुहूर्ताचा प्रयोग गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सुरेश भट सभागृह येथे सादर करण्यात येणार आहे.
अनाथांचा नाथ या नाटकाचे लेखन पुरुषोत्तम मिराशी आणि विलास कुबडे यांचे असून दिग्दर्शन विलास कुबडे करणार आहेत, निर्मिती शामला कुबडे यांची आहे. संत एकनाथांची प्रमुख भूमिका अनिल पालकर यांची आहे.
नाटकाच्या मुहूर्त प्रसंगी लेखक पुरुषोत्तम मिराशी, अ भा मराठी नाट्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश आणि अपर्णा लखमापुरे, रमेशचंद्र दीक्षित, प्रशांत मंगदे, संजय रहाटे, अनिल पालकर, अभय अंजीकर, मंजुषा देव, वीरेंद्र लाटणकर, सतीश बगडे, दीपलक्ष्मी भट, अनिल देव, अमित कुबडे, मोहन पात्रीकर, करुणा मंगदे, श्रद्धा रायकर, प्रवीण देशकर, मिलिंद रामटेके, जयदेव वानखेडे, दीप्ती भाके, अवंती वेरुळकर, हर्षाली काईलकर, वैशाली पोचमपल्लीवार, भावना चौधरी, सुनीता गजभिये, वल्लभ पाठक, तुषार पाठक आणि इतर बरेच रंगकर्मी उपस्थित होते.