

घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते वाटप
दोनशे पेक्षा जास्त स्पर्धाकांनी घेतला स्पर्धेत सहभाग.
हिंगणघाट : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.
या गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. बक्षीस वितरण सोहळ्याला वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रथम बक्षीस शुभम राजू शेंडे, दृतीय बक्षीस स्वेता वसंतराव भलावी, तृतीय बक्षीस विनीत येलगंधेवार तर चौथे बक्षीस किरण देवगिरकर आणि पाचवे बक्षीस सौं. दिपाली सुरकार यांना देण्यात आले. त्याचबरोबर प्रोत्साहन बक्षीस शरद लोणकर, शर्वरी निलेश वाघ, योगेश वाघमारे यांना देण्यात आले. सर्व स्पर्धकांनी खूप छान आणि सुंदर असे डेकोरेशन देखावे तयार केले. तसेच सर्व सहभागी स्पर्धेकानां सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
गणेशोत्सव हा सण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी लहान बालगोपालामध्ये गणपतीचे सजावट करण्याचे उत्साहाचे वातावरण असते. दहा दिवस मोठ्या भक्ती भावात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती सजावट बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून लहान गोपालांचे मनोबल वाढते असे मनोगत खासदार अमर काळे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाची रूपरेषा युवक जिल्हा महासचिव राजू मुडे यांनी मांडली, तर कार्यक्रमाचे संचालन वैभव साठोने यांनी केले तर या कार्यक्रमात आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, माजी नगरसेवक दादा देशकरी, युवकजिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, किसान सेलचे किशोर चांभारे, उपसरपंच प्रवीण कलोडे, जगदीश वांदिले, संदीप चांफले, अजय पर्बत, सुनिल भुते, गजानन महाकाळकर, प्रवीण भूते, नितीन भुते, समीर बाळसराफ, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा उपाध्यक्षा मिना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हुकेश ढोकपांडे, पंकज भट,रवीकिरण कुटे, राहुल जाधव, आकाश हुरले, ओम वांदिले, गौरव तेल्हांडे, कुणाल भुते, मनीष मुडे, पप्पू आष्टीकर, योगेश देशमुख, आदित्य तडस, निखिल ठाकरे, प्रेम भडघरे, मो. शाहिद आदींनी सहकार्य केले.