सभेचे रूपांतर माझ्या विजयात होईल

0

 

बुलढाणा(Buldhana): शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतून लोक जे विचार घेऊन गेलेत त्याचे रूपांतर विजयात होईल.उद्धव ठाकरेंचे विचार अत्यंत मनाला भिडले, नक्कीच याचे रूपांतर 4 जूनला विजयात होईल असा दावा बुलडाणा मतदारसंघातील मविआ उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी केले. या मतदारसंघात सहा आमदार भिडलेले आहेत.जिथे आमची सभा झाली, तिथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. चिखलीत नितीन गडकरी येत आहेत. आणि अभिनेता गोविंदा यांची सुद्धा रॅली होत आहे. काल जे पी नड्डा येऊन गेलेत त्यांचे काय हाल झाले. शेवटी त्यांच्या आमदारांना सांगावं लागलं की लोक हेलिकॉप्टर पाहायला गेले. इतके मूर्ख राहिले का लोक ? एकीकडे सामान्य लोक विमानात बसण्याची ताकद निर्माण करू म्हणता दुसरीकडे अशी अवस्था आहे त्यांची, माझी निश्चितच महायुतीच्या उमेदवारासोबतच लढत आहे असेही नरेंद्र खेडेकर म्हणाले.