गजानन महाराजांचा प्रगट दिन

0

१३ फेब्रुवारी म्हणजेच आज श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिवस. आज शेगाव श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दुमदुमलेलं पाहायला मिळत आहे. आज फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत.”श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे.

आज फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत.”श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं आहे.

श्री गजानन महाराजांचा परिचय

शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखलं जातं, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साई बाबा ही श्री दत्तांची पहिली दोन रुपं म्हमून ओळखली जातात. श्री गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये १३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले होते, महारांजांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही, म्हणूनच १३ फेब्रुवारी हा दिवस श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती.

 

हजारो भाविकांनी दुमदुमलं शेगाव

 

श्री गजानन महाराज प्रकट दिन हा बुलडाण्यातल्या शेगाव इथं शुभ दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्रास्त अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळतो. या दिवशी संपूर्ण शेगावात पूजा, आरती,अभिषेक, पालखी, पारायण पाहायला मिळतं. हजारो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्याने शेगावाला एका जत्रेचं रुप आलेलं पाहायला मिळत आहे.

 

जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला[ संदर्भ हवा ].

समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, “आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||”

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती.

महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, “जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरूपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||” आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.

८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली