पेट्रोल बॉम्ब फेकणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

पोलिसांना गुंगारा देणारा सुरज संतोष गुप्ता याला नागपूर च्या धरमपेठ येथून अटक. बल्लारपूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.

बल्लारपूर (Ballarpur):-
काही दिवसापूर्वी बल्लारपूर मधील मालू नावाच्या कपडा दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून दहशत माजावीणारा व पोलिसांना गुंगारा देऊन नागपूर येथे फरार झालेला सुरज संतोष गुप्ता याला नागपूर च्या धरमपेठ येथून अटक करण्यात आल्याने बल्लारपूर पोलिसांच्या कामागिरीचे सर्वत्र कौतुक केल्या जातं आहे.

दि.03/08/2024 रोजी मालू कापड दुकान बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी नामे सुरज संतोष गुप्ता वय 31 वर्ष यांची गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिल्डिंग लागली आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन (Superintendent of Police Mumakka Sudarshan) ,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर (धरमपेठ )येथे सापळा रचून पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख ,पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, Asi गजानन डोईफोडे, मेघा आंबेकर कल्याणी पाटील यांनी सापळा रचून पकडले.