
(Buldhana)बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेडनेट कापूस, टोमॅटो, मिरची, गहू, हरभरा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली . या गारपिटीने शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले. शेतकऱ्यांसाठी भरीव मदत कशी मिळेल यासाठी सभागृहात सगळे मिळून प्रयत्न करणार असल्याची माहिती (Opposition leader Ambadas Danve)विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या सिडनेटला विमाचे संरक्षण नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथे शेतकऱ्यांसोबत बोलताना दिली. बुलढाणा जिल्ह्यात 26 , 27 नोव्हेंबरला अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सिंदखेडराजा, लोणार, देऊळगाव राजा या भागांमध्ये गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेल्या शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.सीड कंपन्यांनी सुद्धा हात वर केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा विरोधी पक्ष नेत्यांसमोर मांडल्या आहेत. येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
नुकसानग्रस्त पिकांची वंचित बहुजन युवा आघाडीकडून पाहणी
(Amravti)अमरावती- अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यासह तिवसा तालुक्यातील कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकाची पाहणी करतांना केली आहे. यावेळी जिल्हा सदस्य बबलू मुंद्रे, उंबरखेड शाखा अध्यक्ष रोषण ढोणे, भारसवाडी शाखा अध्यक्ष सागर गोपाळे, तेजस गडलिंग, अभिजीत मुंद्रे, रुपाली मुंद्रे आदी उपस्थित होते