

नागपूर -अंदाज अपेक्षित होते आणि त्याप्रमाणेच होणार, चारही राज्यात काँग्रेसच जिंकणार आहे.तेलंगणात अतिरिक्त विजय होईल. मध्यप्रदेश,राजस्थान, छत्तीसगड जिंकणार, ही सर्व मेहनत राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी मेहनत घेतली पाचही राज्यात. हे निकाल पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्वपूर्ण ठरेल, दिल्लीमध्ये सुद्धा पुढच्या काळात बदल झालेला दिसेल असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना सुपारी कोणी दिली? मी सुपारी पाहिली नाही आणि मला अडकित्ता सुद्धा आठवत नाही. कोणाकडे अडकित्ता आहे? कोण सुपारी आहे? आणि कोण फोडणार? येणाऱ्या काळात दिसेलच. लढाई कोर्टात सुरू आहे. राज्यात पक्षफोडीचा नवा उद्योग सुरू झाला आहे. त्याचे पाप त्यांना फेडावे लागेल. सध्या मनोज जरांगे, छगन भुजबळ यांच्यापेक्षा अवकाळी पावसामुळे शेतकरी नुकसानीचा महत्वाचा विषय आहे. पीक विमा आधी मिळत नव्हता, वेदनेने ते निकष बदलविले म्हणून सांगतात. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. सरसकट मदत मिळावी, कर्जातून मुक्त करणे हा उपाय, पिकाची वर्गवारी करावी. लवकर मदत जाहीर करावी, पीक विमा कंपन्यांना वठणीवर आणावे, टक्केवारी मंत्र्यांना मिळत आहे. विमा कंपन्यांकडून सरकार घेत आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहे. अप्लिकेशनला वेळ मिळत नाही, पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपलब्ध नसतात, शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी मंत्री जात नाहीत.उघडपणे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. 2022 च्या दुष्काळाचे पैसे अजूनही दिले नाहीत.
तायवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात छेडले असता केवळ बबनराव तायवाडेच बोलले नाहीत, आज राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी आहे. हे केवळ आपले पाप लपवून ठेवण्यासाठी करत आहेत.
जरांगे- भुजबळ संघर्ष पेटवला जात आहे. खालच्या दर्जाचे राजकारण कोणी सुरू केले ? टिपणी कोणी सुरू केली. शिवीगाळचा प्रकार कुठून सुरू झाला? हे आपण समजलं पाहिजे. हे दुर्दैव आहे राज्याचं कोणीही नेता अस बोलतो. बोलण्याच्या मर्यादा पाळाव्या लागतील मर्यादा पाळाव्यात अशी आमची विनंती असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.