

Independence Day नवी दिल्ली (New Dellhi), 10 ऑगस्ट (हिं.स.) – 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (78th Independence Day)पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला. ()
चमूचं नेतृत्व ग्रुप कॅप्टन जय किशन यांनी केलं. दिव्यांग उदयकुमार आणि इतरांचा समावेश असणाऱ्या या चमूने कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ते किलिमंजारो मोहीम (मिशन K2K) हाती घेतली आणि या मोहिमेत पहिल्यांदाच एका दिव्यांग गिर्यारोहकाने कुबड्या वापरून गिर्यारोहणाचा यशस्वी प्रयत्न करत आणखी एका ऐतिहासिक यशाची गाथा लिहीली.(78th Independence Day)
या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्प पासून सुरू केला आणि 15500 फुट उंचीवरील कीबु हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. तिथे त्यांनी 7800 चौरस फुटाचा राष्ट्रीय ध्वज जमीनीवर जाळे, दोर आणि खिळ्यांच्या सहाय्याने प्रदर्शित केला.
हवामानाची स्थिती तसंच सर्व सहभागींची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन, चमूने उहुरू शिखराकडे 8 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता प्रयाण केले. वादळी वातावरणात निसरड्या मार्गावर पर्वतीय भागात 85 अंश सरळ अशी कष्टदायक दहा तासांची कष्टदायक चढाई करत त्यांनी दुपारी एक वाजता 5,895 मीटर उंचीवरील (19,341 फूट )उहूरू शिखर गाठले आणि किलीमंजारो पर्वतावरील उहूरू शिखरावर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला. चिकाटी आणि सहकार्य यातून हे साध्य करता आले. भावी दिव्यांग पिढ्यांना स्फूर्ती देणे आणि इतर वंचित युवकांना त्यांची स्वप्ने कितीही अप्राप्य वाटली तरी ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे हा या ऐतिहासिक मोहिमे मागील उद्देश आहे.