
सिंखेडराजातून प्रचारास सुरुवात
बुलढाणा (Buldhana) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तुपकरांच्या हाती आता पाना आला आहे, त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट कसणार, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून कानी पडत आहे.आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन तुपकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होत. रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार असून, त्यांना पाना हे चिन्ह मिळाले आहे. आता जिल्हाभर हा पाना फिरणार आहे. जिल्ह्यातील खिळखिळा झालेल्या विकास रथाच्या चाकाचे नट आता रविकांत तुपकर पाना फिरवून फिट करणार असल्याचा दावा समर्थक करीत आहेत. रविकांत तुपकर यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता, राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला. जिल्हाभर आता जनतेचा बाणा निवडून आणू पाना, पाना…पाना… पाना… रविकांत तुपकर निवडून आणा असे नारे ऐकावयास मिळाले.
















