जुन्या पेन्शनचा मुद्दा तापणार,राज्य सरकारी कर्मचारी संपावर

0

 

नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करा, यासाठी राज्यातील सरकारी कर्मचारी,अधिकारी आजपासून संपावर आहेत. कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली, मात्र, या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटनेने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत या मुद्द्यावर पुन्हा एकदा सरकारला संघटनांनी घेरले आहे. राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली. या संपामुळे शासकीय कामासोबत आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाला आहे. निदर्शनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचा निर्धार संघटनेने घेतला आहे. राज्य सरकारने आश्वासन लेखी स्वरूपात द्यावे किंवा मग अधिवेशना दरम्यान पटलावर हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा, निर्णय घ्यावा, अशी संघटनांची मागणी असल्याचे सुनील पंडित (राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद), रावसाहेब निमसे (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद) यांनी स्पष्ट केले.