नवी दिल्ली : स्कायमेट या अमेरिकन हवामान संस्थेने यंदा कमी पावसाचे भाकित वर्तविलेले असताना देशात सामान्य म्हणजे ९६ टक्के पाऊसमानाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. देशात ‘एल निनो’ चा प्रभाव जाणवणार असला तरी त्याचा पावसावर फारच कमी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे (Monsoon 2023 Prediction by IMD). स्कायमेटने यंदा उत्तर व मध्य भागात कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अंदाज काहीसे दिलासा देणारे असून सामान्य पाऊसमानाचे अंदाज वर्तविणारे आहेत. ९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस अतिवृष्टीच्या तर ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस दुष्काळाच्या वर्गवारीत मोडतो. देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. ‘अल निनो’मुळे भारतात अनेकदा मान्सून कमकुवत होतो. यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते. देशात वर्षभर जेवढा पाऊस होतो त्यापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 20 टक्क्यांच्या आसपास आहे.
आयएमडी म्हणतेय यंदा पावसाचे प्रमाण सामान्यच राहणार
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA
















