
गोंदिया GONDIYA – संपूर्ण देशाबरोबरचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात सध्या कोणताही New variant नवीन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरी आवश्यक त्या उपाययोजना जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
असा प्रसंग उद्भवल्यास जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून आवश्यक ते व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा, औषधांचा भरपूर साठा असून अशा परिस्थिती हाताळण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभाग सज्ज असल्याचे शासकीय महाविद्यालयाचे डीन कुसुमकर घोरपडे यांनी सांगितले.