खडीगंमत महोत्सवाचा थाटात समारोप

0

लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर (Nagpur), 1 एप्रिल
सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘खडीगंमत – 2024’ या तीन दिवसीय महोत्‍सवाचा थाटात समारोप झाला. लोककलेतून जागरण करणा-या या महोत्‍सवाला रसिकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दुसऱ्या दिवशी शाहिरा उर्मिला चौधरी व चमूने ‘सावित्रीबाई फुले व त्यांचे समाजकार्य’ विषयावर सादरीकरण केले तर समारोपाच्‍या दिवशी शाहीर निशान सुखदेवे व शाहीर पुरुषोत्तम खांडेकर व चमूने बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनेतील योगदान या विषयावर सादरीकरण केले.

लुप्त होत चाललेली लोककला जिवंत राहावी व उत्तरोत्तर वृद्धिगत व्हावी व तिचा विकास व्हावा तसेच, तिचा प्रचार व प्रसार करून तरुण पिढी या लोककलेकडे आकर्षित व्हावे, हाच एकमेव उदात्त उद्देश ठेवून सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात केले होते.

सहायक संचालक संदीप शेंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी शाहिरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाहीर अलंकार टेंभुर्णे, शाहीर निनाद बागडे, शाहीर राजकुमार गायकवाड, शाहीर नरेश वासनिक, शाहीर वेंकट गजभिये, शाहीर वसंता दूंडे प्रामुख्याने उपस्थित होते. कुलदीप कोवे यांनी सर्वांचे आभार मानले.