मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली- वडेट्टीवार

0

 

नागपूर- मराठा आरक्षणाबद्दलच्या कालच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी आमची भूमिका होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर हे मराठा आरक्षणाला न्याय देणारे नव्हते. मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
आधी समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता म्हणताय फेब्रुवारीमध्ये देऊ हा विश्वासघात असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.