Pooja Khedkar : खेडकरांचे प्रताप….

0

 

सध्या सनदी अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar)यांचे प्रकरण गाजते आहे. त्यांनी आयएएस होण्यासाठी ज्या काही लब्बाड खेळ केले आहेत ते पाहून सर्वच अवाक झाले आहेत. आज प्रशिक्षणार्थी असताना आपल्या खासगी ॲाडी गाडीवर बेकायदेशीरपणे लाल दिवा लावण्याचा उद्दामपणा प्रकार येणारया काळात त्या काय करु शकतील याची चुणूक दिसते.

हा उद्दामपणा कुठून आला हे समजून घ्यायचे असेल तर त्यांचे पिताश्री दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांची थोडी माहिती जनतेसमोर आली पाहिजे.हे महाशय MPCB मधून RO म्हणून निवृत्त झाले आहेत. 2007 पासून 3 वर्षे कोल्हापूरमध्ये MPCB मध्ये रिजनल ऑफिसर (RO) होते. या दरम्यान याच खेडकरांनी कोल्हापूर मध्ये खूप धुमाकूळ घातला होता. काही महिन्यातच यांनी छोट्या छोट्या कारणांनी अनेक फौंड्रिंजना क्लोजर नोटीसा काढल्या. हे महाशय फॉउंड्री visit ला एकटे जात, ड्राइवर सुद्धा सोबत नेत नसत. MPCB ची जीप स्वतः चालवत खेडकर फॉउंड्री मध्ये पोहचत असत. (क्लास वन अधिकारी असून सुद्धा, खेडकर जिथं जिथं होते तिथं तिथं MPCB मधील फील्ड ऑफिसर, SRO यांना कोणतेच काम करावे लागत नसे). सर्व फाइल त्यांच्याच कडे असत. Visit झाल्यावर अनेक असलेल्या नसलेल्या त्रुटी प्लेन पेपर वर लिहीत. कोणाला चिमणी लहान आहे, मोठी कर, कोणाला स्करबर वेगळा लाव असे सांगत व स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत 8 दिवसात Purchase order काढून ऍडव्हान्स पाठवा अन्यथा Closure ची कारवाई करू.

याच कंपनीत खेडकरची पत्नी, मेहुणा व पूजा संचालक आहेत. (कागदोपत्री खेडकर व त्याची पत्नी विभक्त आहेत. तसें पत्र पुजा ने UPSE ला दिलेले आहे )
उद्योजक हैराण होते, जी Stack (चिमणी) 1 ते 2 लाखात बाजारात उपलब्ध होते, तिची किंमत खेडकरांच्या Thermovetara कंपनी कडून 20 ते 22 लाख यायची. ज्या उद्योगानी त्यांच्या कडून चिमणी घेतली नाही अशा जवळजवळ 15 ते 17 फॉउंड्रिज ना closure नोटीसा मिळाल्या.
आज पूजा खेडकर वापरात असलेली महागडी गाडी (Audi) याच कंपनीच्या मालकीची आहे.

या खेडकर महाशयांची किमान 3 वेळा विभागीय चौकशी (DE) झाली आहे. MPCB हेड ऑफिस मध्ये सर्वात जास्त वेळा चौकशी यांचीच झाली आहे. अनेक फायली फक्त खेडकर यांना समर्पित आहेत.

याच्या चौकशी ची मागणी लघु उद्योग भारतीने पण केली होती. संभाजीनगर (औरंगाबाद) RO ऑफिस मध्ये याने भ्रष्टाचाराचे थैमान घातले होते. संभाजीनगरला Common Effluent Treatment Plant असूनसुद्धा व सर्व उद्योग CETP चे सभासद असून देखील त्यांचे कनसेन्ट मध्ये यांनी नको नको ते parameter घुसडले व पैसे उकळले. तिथे यांनी वेगळी पद्धत वापरली. RTI कार्यकर्ते यांना विविध माहिती देऊन उद्योग घटका कडे पाठवायचे आणि उद्योजकांची पिळवणूक करायची. आम्ही लघु उद्योग भरती कडून याची तक्रार दिल्यावर याने आम्हालाच गोड भाषेत समजावले कि या पोस्टिंग साठी 10 कोटी वर दिले आहेत त्याची वसुली नको का करायला. एक प्रकरणात हे महाशय रंगेहात सापडले पण राजकीय वरदहस्ताने हाताखाली काम करणारे राठोड यांच्या वर सगळे थोपवून हे महाराज सुटले.

या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीप खेडकरच्या फाईल पण उघडल्या तर बरे होईल. एकूणच महाराष्ट्रातील नोकरशाही मधील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेसण घालता येईल आणि राज्याच्या प्रगतीमधील अडसर दूर होतील.

माधव कुलकर्णी
लघु उद्योग भरती,
सांगली

 

Pooja khedkar in hindi
Pooja khedkar news
Pooja khedkar story
Pooja khedkar age
Pooja khedkar full story
Pooja khedkar wiki
Pooja khedkar instagram
Pooja khedkar case in hindi
Dilip khedkar wikipedia
Dilip khedkar ias biography
Dilip khedkar party
Dilip khedkar cast
Dilip khedkar biography
Puja khedkar disability
Pooja khedkar controversy
Dilip khedkar post