काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस नागपुरात होणार साजरा

0

नागपूर – काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरात साजरा होणार असून सोनिया गांधी, राहुल व प्रियंका गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात शुक्रवारी हॉटेल ली मेरिडियन येथे झालेल्या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस,राज्याचे प्रभारी के.सी,वेणूगोपाल, मुकूल वासनिक नागपुरात आले. अमरावती रोडवर दाभा येथे सभेची तयारी केली जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील,
माजी मंत्री प्रदेश, कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ नितीन राऊत, सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर डॉ विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, नागपूरशहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. भाई जगताप,. अमर राजूरकर , नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, अभिजीत सपकाळ आदी नेते या बैठकीत उपस्थित होते.