महायुतीचा फॉर्म्युला ठरला!

0

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. भाजप लोकसभेच्या २६ जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित करण्यात आले आहे. प्रस्तावित जागांवर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपावर लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या मतदारसंघाचे सर्व्हेक्षण झाले असून मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला मतदारांची पसंती आहे याचे कल हाती आले आहेत.आमच्याकडे विजयी होणा-या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणे ही परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.