यवतमाळच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र !

0

 

(Yawatmal)यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत नापिकीला सामोर जावं लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या परिस्थितीला कंटाळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ तालुक्यातील वाई-रूई येथील शेतकरी कुणाल जतकर यांनी मुख्यमंत्र्यांना थेट रक्ताने पत्र लिहिले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मारण्याचं काम करत आहेत की का हे प्रश्न उपस्थित होत आहे.

तरी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं मुख्यमंत्र्यांनी करावं, अशी मागणी या माध्यमातून केली जात आहे.