
तरुणाची आत्महत्या
(Nagpur)नागपूर– सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरूण सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Shubham Kamble) शुभम कांबळे (वय २५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे तो अन्न व औषध प्रशासन विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते. तो परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी होता व मित्राला भेटण्यासाठी नागपुरात आला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. (Young Officer commits Suicide )
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम हा २५ नोव्हेंबर रोजी सकाळी नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आला होता. त्याने सेंट्रल एव्हेन्यू येथील हॉटेल राजहंस येथे रूम बूक केली होती. तो या हॉटेलच्या रूम नंबर ३११ मध्ये थांबला होता. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या हॉटेलच्या लँड लाइनवर शुभमसाठी फोन आल्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाने रूमबॉयला शुभमच्या खोलीकडे पाठवले होते. पण, त्याने आतून कुठलाही न दिल्याने पोलिसांना बोलावण्या आले. गणेशपेठ पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले व त्यांनी दरवाजा उघडल्यावर शुभमचा मृतदेह बेडवर आढळून आला. खोलीतून दुर्गंध येत होता. मृतदेह मेयो रुग्णालयात हलविण्यात आला.
पोलिसांनी पाहणी केल्यावर हॉटेलच्या खोलीत त्यांनी स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य आढळून आले. ते पिऊनच त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आएएएस किंवा आयपीएस न झाल्याची खंत सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली आहे.