

नागपूर (Nagpur)पोलीस ठाणे अंबाझरी येथील आज दिनांक 04/02/2025 रोजी दिवस पाळी कर्तव्यावरील बीट मार्शल pc उज्वल पाटेकर ब.नं 7031, pc विजय उपरे ब.नं 7055 हे फुटाळा परिसरात पेट्रोलिंग करत असताना CFS वरून एक व्यक्ती फुटाळा तलाव येथे उडी मारली आहे असा कॉल प्राप्त झाला असता तात्काळ दोन ते तीन मिनिटात बीट मार्शल फुटाळा विसर्जन पॉईंट येथे पोहोचले व तेथील स्थानिक पोहणाऱ्या व्यक्ती नामे रुपेश राजू आत्राम वय 32 वर्ष याच्या मदतीने त्यास पाण्यातून बाहेर काढुन जीवदान देण्याचे अनमोल व अभिमानास्पद कार्य केले आहे.
जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीने वाचविले आत्महत्या करणाराचे प्राण
पोलिसांच्या मदतीने अंबाझरी पोलीस ठाणे येथे आणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना माहिती देऊन त्यांनी त्याचे कौन्सिलिंग करून मानसिक आधार देऊन उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले, व स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारून जीव वाचवणारा स्थानिक रहिवासी रुपेश आत्राम व बीट मार्शल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यास रोख बक्षीस देण्यात आले, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे.